धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 29188
महाळपूर (ता. शिंदखेडा) : श्रावण सोमवारनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना स्पोर्ट्स ड्रेस वाटपावेळी उपस्थित शिक्षणप्रेमी तरूणांसह शाळेचे शिक्षक.
--
महाळपूर शाळेत विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वाटप
--
शिक्षणप्रेमी तरुणांचा श्रावण सोमवारनिमित्त कौतुकास्पद उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ : महाळपूर (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी डिजिटल शाळेत श्रावण सोमवारच्या निमित्ताने शिक्षणप्रेमी युवा मित्रांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत तरुणांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
-
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गावातील तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला. सर्व विद्यार्थ्यांना एकसमान स्पोर्ट्स ड्रेस मिळाल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षणप्रेमी युवा मित्र रूपेश निकम, शंकर सोनवणे, ललित सूर्यवंशी, धिरज पवार, धनंजय निकम, साईराज पाटील आणि चंद्रशेखर निकम यांनी हा उपक्रम राबविला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना क्रीडा, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. तरुणांनी शिक्षण क्षेत्राशी जोडून घेत विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून केलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शालेय प्रशासनाच्या वतीने सर्व युवा मित्रांचे आभार मानण्यात आले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. शिक्षक योगेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक सुधीर पाटील यांनी आभार मानले.