फोटो : 29195
नंदुरबार ः विद्यार्थी गुणगौरव समारंभास उपस्थित चंद्रकांत रघुवंशी, मनोज रघुवंशी, हिरालाल चौधरी, दीपक दिघे, मोहित राजपूत, यशवर्धन रघुवंशी, शोभा चौधरी, नाना शिरसाट, दीपक शिंदे आदी.
--------------------
नंदुरबार नाभिक समाजातर्फे
संत सेना महाराज पुण्यतिथी
नंदुरबार, ता. १० : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नंदुरबार शहर नाभिक पंचमढी ट्रस्ट व नाभिक समाजातर्फे अभिवादन कार्यक्रमासह विद्यार्थी गुणगौरव व रक्तदान शिबिर झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते. या वेळी प्रतिमापूजन झाले. उद्योगपती मनोज रघुवंशी, नगरसेवक हिरालाल चौधरी, दीपक दिघे, शिवसेना युवा अध्यक्ष मोहित राजपूत, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, नगरसेविका शोभा चौधरी, नाभिक पंचमढी ट्रस्टचे अध्यक्ष नाना शिरसाट, शहराध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष राजेश पवार, दुकानदार अध्यक्ष धनराज वरसाळे, युवा अध्यक्ष जयेश वरसाळे, गणेश मंडळ अध्यक्ष दुर्गेश शिरसाठ, महिला महामंडळ अध्यक्ष कुंदा सोनवणे, किशोर सोनवणे, अनिल महाले, दिलीप बोरसे, किरण सैंदाणे, महेश पवार, पंकज सूर्यवंशी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. आमदार रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान केले. नाभिक समाजाचे सचिव सुनील वारसाळे यांनी सूत्रसंचालन केले.