हेल्थसाठी लेख टुडे ४ डॉ. किरण शांडिल्य

हेल्थसाठी लेख टुडे ४ डॉ. किरण शांडिल्य
Published on
टुडे पान-४ साठी -------- फोटो ः डॉ. किरण शांडिल्य ः NSK26H29208 --------- ३६-४ एक संवाद एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतो! ---------- ‘मला मरायचं नाहीये. पण ही वेदना घेऊन जगायचं कसं, हे मला कळत नाही’ कधी कधी आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती मृत्यू मागत नसते; ती फक्त असह्य मानसिक वेदना थांबाव्यात अशी इच्छा व्यक्त करत असते. अशावेळी ‘माझ्याशिवाय सगळे सुखी होतील’ किंवा ‘जगण्यात काही अर्थ नाही’ अशी वाक्ये ऐकू आली तर ती गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. - डॉ. किरण शांडिल्य, मानसोपचार तज्ज्ञ ----------------------------- ए खादी व्यक्ती अचानक एकटी राहू लागणे, सतत निराश दिसणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी सोडणे, झोप किंवा भुकेत मोठे बदल होणे, स्वतःला इजा करणे किंवा आत्महत्येबद्दल बोलणे ही महत्त्वाची चिन्हे आहेत. तीव्र मानसिक तणाव, नैराश्य, व्यसन किंवा मोठ्या जीवनसंकटाच्या काळातही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आत्महत्येबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला ‘फक्त लक्ष वेधून घेत आहे’ असे म्हणून दुर्लक्षित करू नका. १६-१ कुटुंबाने काय करावे? तुम्ही थेट विचारा ‘तुला स्वतःला इजा करण्याचा किंवा जीवन संपवण्याचा विचार येतोय का?’ असा प्रश्न विचारल्याने आत्महत्येचा विचार मनात निर्माण होत नाही. उलट, व्यक्तीला आपले मन मोकळे करण्याची संधी मिळते. तिचे शांतपणे ऐका. लगेच सल्ला किंवा भाषण देऊ नका. ‘मी तुझ्यासोबत आहे’, ‘तू एकटा नाहीस’, ‘आपण मिळून मदत घेऊया’ असे सांगा. तातडीचा धोका असेल, तर व्यक्तीला एकटे सोडू नका. त्वरित वैद्यकीय किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. १६-१ काय बोलू नये? ‘तुझ्याकडे तर सगळं आहे’, ‘मजबूत हो’, ‘आई-वडिलांचा विचार कर’, ‘इतर लोकांच्या समस्या बघ’ किंवा ‘तू फक्त लक्ष वेधून घेत आहेस’ अशी वाक्ये टाळा. अशा शब्दांमुळे व्यक्तीला अपराधीपणा आणि एकटेपणा अधिक जाणवू शकतो. लाज किंवा अपराधीपणा मानसिक वेदना दूर करत नाहीत; संवाद, आधार आणि योग्य उपचार मदत करतात. १६-१ आत्महत्येबाबत ५ महत्त्वाच्या गोष्टी १. आत्महत्या टाळता येऊ शकते. योग्य वेळी मिळालेली मदत आणि उपचार महत्त्वाचे ठरतात. २. आत्महत्येबद्दलचे बोलणे गंभीरपणे घ्या. ‘तो फक्त बोलतोय’ असे गृहीत धरू नका. ३. थेट विचारा. एक साधा प्रश्नही मदतीची सुरुवात ठरू शकतो. ४. तातडीच्या धोक्यात व्यक्तीला एकटे सोडू नका. त्वरित मदत घ्या. ५. मानसिक आजार ही कमजोरी नाही. नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार होऊ शकतात. आपल्याकडे प्रत्येक समस्येचे उत्तर असणे गरजेचे नाही. कधी कधी फक्त एवढे म्हणणे पुरेसे असते ‘मी तुझं ऐकतोय.’ ‘तू एकटा नाहीस.’ ‘चला, आपण मदत घेऊ या.’ आणि त्यानंतर त्या व्यक्तीसोबत राहणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला आत्महत्येचे विचार येत असतील, तर तातडीने मदत घ्या. आज निराश वाटणारे आयुष्य उद्या पूर्णपणे वेगळे दिसू शकते. मदत मागण्यास घाबरू नका. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com