फोटो आहे.
NSK26H29210
दिंडोरी ः महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचा पदग्रहण, विद्यार्थी विकास शौर्य पुरस्कार वितरणप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी.
-----------------
३६-२
विद्यार्थी सुरक्षिततेसाठी
संघटना बळकट करावी
----
पदग्रहणाप्रसंगी अध्यक्ष नितीन बोढारेंचे आवाहन
-----
सकाळ वृत्तसेवा
दिंडोरी, ता. ९ : राज्यातील विद्यार्थ्यांना सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणी, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार तसेच वसतिगृहांमधील असुरक्षिततेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन अध्यक्ष नितीन बोढारे यांनी केले.
-----------
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेचा पदग्रहण सोहळा व विद्यार्थी विकास शौर्य पुरस्कार वितरण बुधवारी (ता.९) दिंडोरी येथे संघटनेचे अध्यक्ष बोढारे यांच्या नेतृत्वाखाली झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
विद्यार्थी विकास शौर्य पुरस्कार प्रवीण राऊत यांना प्रदान करण्यात आला. दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात रात्रीच्या वेळी विहिरीत उडी मारून विद्यार्थिनींना वाचविण्याचे धाडस केल्याबद्दल राऊत यांना हा पुरस्कार देण्यात आला. संघटनेचे हेतू व कार्य याबाबत राज्य सरचिटणीस निकेतन जाधव यांनी माहिती दिली. संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. राज्य संपर्कप्रमुखपदी कैलास गायकवाड, राज्य सदस्यपदी गणेश भडदिवे, राज्य सदस्यपदी सोमा जगताप, तालुका संपर्कप्रमुखपदी अजय वांजुळ, तर तालुका सरचिटणीसपदी राजेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे, निकेतन जाधव, रवींद्र जाधव, दत्तू शिंदे, राजेंद्र घोडके, संघटनेचे सल्लागार दिगंबर पाटील, मयूर पगार, प्रवीण जाधव, भूषण पवार, मोहन सोळशे, संतोष राऊत आदी उपस्थित होते.
--------------