गुलाबराव पाटलांना डीजेचा त्रास

गुलाबराव पाटलांना डीजेचा त्रास
Published on
मुख्य अंकासाठी ---- ‘डीजे’मुळे डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता घटली उपशीर्षक मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा : लग्नात नाचलो अन्‌ झाला घात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : गणेशोत्सव तोंडावर आहे. या उत्सवात तरुणांनी डीजे वाजविला नाही, तर बरे होईल. कारण, डीजेमुळे माझ्याही डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता ४० टक्क्यांनी कमी झालीय. उजव्या कानाने काम धकून जाते, असा दावा करत डीजेचा धोका ओळखून तरुणांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. बैलपोळ्यानिमित्त भादली (ता. जळगाव) येथे बळीराजाला पोळ्याचा साज वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यात त्यांनी सण- उत्सवांचे महत्त्व व उत्सवात डीजेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत सजग केले. मंत्री पाटील म्हणाले, की महिनाभरापासून पावसाने दडी मारलीय. त्यामुळे पिके धोक्यात आहेत. पाण्याची गरज पावसाशिवाय भागू शकत नाही. सण- उत्सवांचे महत्त्व सांगताना गुलाबराव पाटील म्हणाले, की गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करा. मात्र, डीजेपासून दूर राहा. डीजे वाजविला नाही, तर काही फरक पडत नाही, उलट चांगलेच होईल. घरात पुतण्याचे लग्न होते. जवळचे लग्न असल्याने दोन-चार लोकांनी मला मिरवणुकीत नाचायला ओढले. लग्नात नाचलो, पण डीजे डाव्या कानाजवळ जोरात वाजला. त्यामुळे या कानाची ऐकण्याची क्षमता ४० टक्क्यांनी कमी झाली. कुणी म्हणे, मशीन लावा. ते लावले, तर लोक बहिरा म्हणतील. उजव्या कानाने काम धकून जाते. मात्र, तुम्ही डीजेच्या नादाला लागू नका, असेही श्री. पाटील म्हणाले. भाजपचे पश्‍चिम जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, माजी सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com