महिला सक्षमीकरण मेळावामहिला सक्षमीकरण मेळावा

महिला सक्षमीकरण मेळावामहिला सक्षमीकरण मेळावा
Published on
शहर टुडे पान तीनसाठी --------------- NSK26H29095 जळगाव : मोनाली कामळस्कर फाउंडेशनतर्फे महिला सक्षमीकरण मेळाव्यातील विजेत्यांसह मान्यवर. --- कामळस्कर फाउंडेशनतर्फे महिला सक्षमीकरण मेळावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१० : येथील मोनाली कामळस्कर फाउंडेशन संचलित काथार सखी मंच व अस्तित्व लढा फाउंडेशनतर्फे सर्व महिलांना शासकीय योजनांसह कायदेविषयक माहिती व्हावी, महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, यासाठी शेठ नागो गणू वाणी मंगल कार्यालयात प्रेरणा, सक्षमीकरण मेळावा व मंगळागौर कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. मंजुळा मुंदडा, ॲड. भारती कुमावत व ॲड. दीप्ती बारी उपस्थित होत्या. प्रास्ताविक वर्षा कामळस्कर व सुनीता वागळे यांनी केले. त्यात त्यांनी फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती देऊन आयोजित कार्यक्रम महिलांसाठी कसा उपयुक्त आहे व मंगळागौर कार्यक्रमाचे सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. ॲड. मुंदडा यांनी महिलांना कायदेविषयक अधिकाराची माहिती दिली. ॲड. कुमावत यांनी ‘कौटुंबिक हिंसाचार कायदा व मालमत्तेसंदर्भात महिलांचे हक्क’ या विषयी उदाहरणांसह माहिती देत महिलांना खिळवून ठेवले.. शिरसोली येथील महिला भगिनींनी ‘मंगळागौर’वर समूहगीत सादर केले. ॲड. दीप्ती बारी यांनी ‘वैवाहिक कायदे व पास्को कायदा, त्यातील महिलांविषयी तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी मंगळागौरचे गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सूत्रसंचालन काथार सखी मंचच्या अध्यक्षा वर्षा कामळसकर व अस्तित्व लढा फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता वागले यांनी केले. सुनीता वाणी व दिपाली दापोरेकर यांनी आभार मानले. उज्ज्वला पाटील, दिपाली चंदनकर, संध्या वाणी, वैशाली वाणी यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले. ------- विजेत्या स्पर्धक अशा समूहनृत्य विजेते : माधुरी वाणी व त्यांच्या सहकारी (शिरसोली), श्रावण सखी : कोमल प्रशांत वाणी, उत्कृष्ट जोडी : अश्विनी योगेश वाणी व संगीता दत्तात्रय शिंपी. पी. एन. गाडगीळ यांच्याकडून २० लकी ड्रॉ काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com