ॲंकर
NSK26H29227
जळगाव : युवा भारत फोरमतर्फे आयोजित ‘युव्होल्यूशन 2K26’ युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील यशाबद्दल गौरविण्यात आले.. त्याअंतर्गत विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देताना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अन्य मान्यवर.
------
‘युव्होल्यूशन’ युवा महोत्सवात तरुणाईचा जागर
उपशीर्षक
स्पर्धा, प्रेरणादायी मार्गदर्शन; महोत्सवास महाविद्यालयांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : युवा भारत फोरम, जळगाव यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील युवा शक्तीला प्रेरणा देणारा ‘युव्होल्यूशन 2K26’ युवा महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. राष्ट्रनिर्माण, उद्योजकता, आर्थिक साक्षरता, स्त्रीशक्ती जागरण आणि सामाजिक सेवा या विषयांवर केंद्रित या युवा संमेलनाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ढोल-ताशांच्या गजरात भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर युवा कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल बासरीवादनाने उपस्थितांची मने जिंकली. ‘बांबू इंडिया’चे संस्थापक योगेश शिंदे यांच्यासोबत प्रेरणादायी पॉडकास्टचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात स्टेज डान्स, पोस्टर प्रेझेंटेशन, बिझनेस प्लॅन आणि फोकनाद या चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
पोस्टर प्रेझेंटेशन आणि बिझनेस प्लॅन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या, तर फोकनादमधून सहभागी युवकांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विशेषतः ‘तुम्बाड’ संकल्पनेवर आधारित ट्रेझर हंट स्पर्धा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली. स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रनिर्माणाविषयी मार्गदर्शन
प्रमुख मार्गदर्शन सत्रात अखिल भारतीय सेवा भारतीचे प्रमुख विजय पुराणिक यांनी युवकांना राष्ट्रनिर्माण, सामाजिक बांधिलकी आणि विविध सामाजिक उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, ‘बांबू इंडिया’चे संस्थापक योगेश शिंदे, रा.स्व. संघाचे जळगाव शहर संघचालक उज्ज्वल चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होतेे.
‘आर्या’ रोबोटकडून मान्यवरांचे स्वागत
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मान्यवरांचे स्वागत ‘आर्या’ या रोबोटच्या माध्यमातून करण्यात आले. देशभक्तिपर गीतांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर युवा भारत फोरमच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला.
-----
(चौकट)
उत्सवातील विजेते असे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांचे विद्यार्थी व त्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यात मू.जे. महाविद्यालय, केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, रायसोनी, चामुंडामाता वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय विजेते ठरले.
-------------