अतिक्रमण हटविलेल्या जागेवर पुन्हा हॉकर्स आले कसे?

अतिक्रमण हटविलेल्या जागेवर पुन्हा हॉकर्स आले कसे?
Published on
टुडे पान ३ मेन फिचर लोगो : सकाळ इम्पॅक्ट ... NSK26H29238 जळगाव : जी. एस. मैदानासमोर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या हॉकर्सवर कारवाई करताना अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक. NSK26H29239 हॉकर्सचे जप्त साहित्य वाहनात ठेवताना पथकातील कर्मचारी. ---- अतिक्रमण हटविलेल्या जागेवर हॉकर्स आले कसे? महापौरांनी अधिकाऱ्यांना सुनावले; आरटीओ कार्यालयासमोर पुन्हा कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या हॉकर्सच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. याबाबत ‘शहरातील प्रमुख रस्ते हॉकर्सच्या विळख्यात’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी यापूर्वी अतिक्रमण हटविलेल्या जागांवर पुन्हा हॉकर्स कसे बसले, असा थेट सवाल करीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच अतिक्रमणविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागांतील प्रमुख रस्त्यांवर दररोज नव्या हॉकर्सची भर पडत आहे. रस्त्याच्या कडेला हातगाड्या, टेबल-खुर्च्या लावून व्यवसाय केला जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे. परिणामी वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकाऱ्यांना विचारला जाब महापौर काळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी व गाळेधारकही उपस्थित होते. यावेळी महापौरांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त पंकज गोसावी व अधीक्षक संजय ठाकूर यांना ‘सकाळ’मधील प्रकाशित वृत्त दाखविले. बातमीतील छायाचित्रे आणि अतिक्रमणाची ठिकाणे अधोरेखित करून, कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण कसे झाले, याचा जाब त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. कारवाईनंतर त्याच ठिकाणी पुन्हा हॉकर्स बसणार नाहीत, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ते मोकळे ठेवा गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून सायंकाळच्या वेळी बाजारपेठ परिसरासह प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात मोठी गर्दी होते. अशा वेळी रस्त्यांवरील हॉकर्सच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रमुख रस्ते आणि मंडळांच्या परिसरातील मार्ग वाहतुकीसाठी मोकळे ठेवावेत, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी अतिक्रमण विभागाला दिल्या. चौकट ‘आरटीओ’समोरील हातगाड्या हटविल्या दरम्यान, ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाने गुरुवारी सायंकाळी कारवाई केली. उपायुक्त पंकज गोसावी आणि अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी काव्यरत्नावली चौकातील आरटीओ कार्यालयासमोर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगतच्या रस्त्यावर कारवाई केली. रस्त्यावर टेबल-खुर्च्या लावून व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर कारवाई करत पाचपेक्षा अधिक हातगाड्या तसेच सुमारे ५० ते ७० टेबल-खुर्च्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमण काही प्रमाणात हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com