NSK26H29247
गेंदा : शेतातून पथकाने जप्त केलेली गांजाची झाडे.
---
ज्वारीच्या पिकात गांजाची लागवड
---
गेंदा गावातून ९३ लाखांची झाडे जप्त
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ९ : ज्वारी पिकाच्या शेतात गांजाची लागवड करून त्याची जोपासना करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताच्या शेतातून ९३ लाखांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. धडगाव तालुक्यातील गेंदा गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
गेंदाच्या शिवारात निर्मल वनकर पावरा (रा. गेंदा, पो. चिखली, ता. धडगाव) याने ज्वारी पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने शेताची पाहणी केली असता, तेथे ९३ लाख ६ रुपयांची १८६ किलोंची गांजाची झाडे मिळून आली. ज्वारीच्या आंतरपिकात बेकायदा लागवड केली होती. या प्रकरणी पावरा याच्यावर धडगावात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, हवालदार सजन वाघ, योगेंद्र सोनार, दादाभाऊ वाघ, ज्ञानेश्वर पाटील, स्वप्नील गोसावी, दत्तात्रय बागल, सचिन वसावे, अंमलदार यशोदीप ओगले, शोएब शेख, सचिन सैंदाणे, भरत उगले यांनी ही कारवाई केली.