वनसंपदेच्या संवर्धनासाठी ‘पाच झाडांचा संकल्प’

वनसंपदेच्या संवर्धनासाठी ‘पाच झाडांचा संकल्प’
Published on
मालेगाव टुडे पान-२------ वर्धापनदिन लेख ------------ लेखक ः अरुणकुमार भामरे NSK26H29253 ---------------------- इतर शेखर तनपुरे ः NSK26H29254 सोमनाथ आमले ः NSK26H29255 ज्ञानेश्वर शरमाळे ः NSK26H29256 ------------- वनसंपदेच्या संवर्धनासाठी ‘पाच झाडांचा संकल्प’ ------------- वनविभागाचा संकल्प समाजासाठी ठरेल दिशादर्शक ------------- वाढते शहरीकरण, बदलते हवामान आणि घटणारी वनसंपदा यामुळे पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी अधिक व्यापक झाली आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेली झाडे जगविणे, जंगलांचे संरक्षण करणे आणि वन्यजीवांचे अधिवास सुरक्षित ठेवणे यासाठी वनविभागासह समित्या व नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी ‘एक व्यक्ती- पाच झाडे’ हा संकल्प परिसराला हरित आणि समृद्ध करण्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो. - अरुणकुमार भामरे, अंतापूर ----------------- वनसंवर्धनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास त्याचा परिणाम अधिक व्यापक होऊ शकतो. ग्रामपंचायती, शाळा, विविध सामाजिक संस्था, वनसंवर्धन समित्या आणि नागरिकांनी एकत्रितपणे वृक्षलागवड, रोपसंवर्धन, जंगल संरक्षण आणि जनजागृतीचे उपक्रम राबविल्यास परिसरातील वनसंपदा अधिक समृद्ध आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीला सावली, प्राणवायू आणि पाण्याचा आधार देऊ शकते. त्यामुळे वृक्षारोपणाचा संकल्प केवळ एका दिवसापुरता न ठेवता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणे, हीच खरी निसर्गसेवा ठरेल. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारणे आवश्यक आहे. जंगलाकडे केवळ नैसर्गिक संपत्ती म्हणून न पाहता भावी पिढीची अमानत म्हणून त्याचे जतन केले पाहिजे. ‘झाडे केवळ लावायची नाहीत, ती जगवायची; जंगलाकडे केवळ संपत्ती म्हणून पाहायचे नाही, तर भावी पिढीची अमानत म्हणून जपायचे,” असे आवाहन साहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे यांनी केले. ‘वनसंपदेचा थेट संबंध पाणी, शेती आणि मानवी जीवनाशी आहे. जंगलांचे संरक्षण झाले तर जलस्रोत टिकतील, त्यातून शेतीला आधार मिळेल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. वन वाचले तर पाणी वाचेल, पाणी वाचले तर शेती वाचेल, शेती वाचली तर माणूस वाचेल आणि माणूस वाचला तर आपले भविष्य सुरक्षित राहील’ असे वनपरिक्षेत्र अधिकारी, सटाणा सोमनाथ आमले यांनी सांगितले. ‘वनसंवर्धनाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. जंगलाचा अधिवास सुरक्षित राहिल्यास वन्यजीवांचे अस्तित्वही टिकून राहते. त्यामुळे निसर्ग संवर्धन ही केवळ वन विभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘जंगल वाचवा- वन्यजीव वाचवा- निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा’ असा संदेश वनपरिक्षेत्र अधिकारी, ताहाराबाद ज्ञानेश्वर शरमाळे यांनी दिला. प्रत्येक व्यक्तीने प्रतिवर्षी किमान पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन व संगोपन करावे असे आवाहनही त्यांनी केले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com