राज्यात नव्हे तर, देशात एक नंबर नाशिकसाठी सहकार्याची अपेक्षा

राज्यात नव्हे तर, देशात एक नंबर नाशिकसाठी सहकार्याची अपेक्षा
Published on
फोटो :H29257/H29258 नाशिक : श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ, श्रद्धाविहार मंडळांना पारितोषिक प्रदान करताना पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी. -- नाशिक देशात पहिल्या क्रमांकाचे शहर होईल महाजन : आदर्श गणेशोत्सव बक्षीस २०२५ वितरण सोहळा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्त्यांची कामे सुरू असून, त्यामुळे गणेशोत्सवात काहीसा त्रास होतो आहे. परंतु अवघ्या आठ ते दहा महिन्यांनंतर नाशिक हे राज्यातच नव्हे तर देशात पहिल्या क्रमांकाचे शहर असेल. त्यासाठी आपण सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव-''२०२५ पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आदर्श गणेश मंडळांना य प्रसंगी सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविले. परिमंडळ-१ मध्ये श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, तर परिमंडळ-२ मध्ये श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ, वडाळा-पाथर्डी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, महापालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, नाशिक महानगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते. गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक सजावट व शिस्त यांचे मूल्यमापन करणाऱ्या दोन्ही परिमंडळांतील परीक्षकांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. पोलिस आयुक्त कर्णिक यांनी प्रास्ताविक केले. तर, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी आभार मानले. या वेळी उपायुक्त चंद्रकांत गवळी, किशोर काळे उपस्थित होते. -- पारितोषिक प्राप्त गणेश मंडळ (परिमंडळ एक) प्रथम : श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ द्वितीय : वेलकम सहकार्य मित्रमंडळ तृतीय (विभागून) : सरदार चौक मित्रमंडळ, पंचवटी, जय शिव बजरंग कला क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी संस्था, पंचवटी उत्तेजनार्थ : नाशिकचा राजा सूर्यप्रकाश, नवप्रकाश कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मित्रमंडळ, घनकर लेन, न्यू स्फूर्ती लोणार लेन युवक मित्रमंडळ (नाशिकचा चिंतामणी) -- परिमंडळ दोन प्रथम : श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ, श्रद्धा विहार, वडाळा- पाथर्डी द्वितीय : आयएसपी, सीएनपी, वेल्फेअर फंड कमिटी, नाशिक रोड तृतीय (विभागून) : साई रुद्राचा राजा गणेश मंडळ, अशोकनगर, ईगल स्पोर्ट्स ॲन्ड सोशल क्लब, नाशिक रोड उत्तेजनार्थ : ओंकार कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक सांस्कृतिक मंडळ, उपनगर, शिवयुवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था, देवळाली कॅम्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com