शहरात मुख्य चौकांत बाप्पांच्या मूर्तींची दुकाने; भाविकांची गर्दी

शहरात मुख्य चौकांत बाप्पांच्या मूर्तींची दुकाने; भाविकांची गर्दी
Published on
NSK26H29273 जळगाव : बाजारात दाखल झालेल्या श्रीगणेशाच्या विलोभनीय मूर्त्या. --- मुख्य चौकांत श्रीगणेशाच्या मूर्तींची सजली दुकाने पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष प्राधान्य; भाविकांची बाजारपेठांमध्ये गर्दी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१० : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमध्ये गणेशमूर्तींची दुकाने सजली असून, श्रीगणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सकाळपासूनच अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. गणेशमूर्ती विक्रेत्यांनी यंदा पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष प्राधान्य दिले आहे. शाडू मातीपासून तयार केलेल्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या मूर्तींची मागणी वाढत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. घरगुती गणपतीसाठी लहान आकाराच्या मूर्तींपासून सार्वजनिक मंडळांसाठी मोठ्या आकाराच्या मूर्ती उपलब्ध आहेत. मुख्य चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या स्टॉलवर आकर्षक सजावट करण्यात आली असून, पहाटेपासूनच मूर्तींची मांडणी सुरू असते. अनेक भाविक कुटुंबासह बाजारात येऊन आपल्या पसंतीची मूर्ती निवडताना दिसत आहेत. विशेषतः पारंपरिक पगडी, मुकुट, विविध आसनांतील गणेशमूर्ती तसेच आकर्षक सजावटीच्या मूर्तींना चांगली मागणी आहे. वातावरण झाले भक्तिमय गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख मार्गांवर आवश्यक नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. गणेशोत्सवजवळ येत असल्याने पुढील काही दिवसांत मूर्ती घेण्यासाठी होणारी गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी शहरातील वातावरण हळूहळू भक्तिमय होत असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com