धुळे : टुडे पान ३ साठी...
--
फोटो क्रमांक : 29275 - कुणाल पाटील.
--
कुणाल पाटीलांच्या वाढदिवसा
निमित्त आठवडाभर सेवा सप्ताह
--
वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध समाजोपयोगी व लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवस सेवाभावाचा... संकल्प लोकहिताचा या संकल्पनेवर आधारीत सेवा सप्ताह १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती धुळे बाजार समितीचे सभापती योगेश पाटील यांनी दिली.
-
माजी आमदार पाटील हे जनतेसाठी सदैव तत्पर असून त्यांनी कृषी, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याची जोड देत १२ सप्टेंबरला सकाळी दहाला आर्वी (ता. धुळे) रोकडोबा मंदिर येथे भाविकांना महाप्रसाद वाटप होईल. १३ सप्टेंबरला बाजार समिती आवारात वृक्षारोपण, १४ सप्टेंबरला सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा, १५ सप्टेंबरला पशुधन लसीकरण, १६ सप्टेंबरला महास्वच्छता दिन, १७ सप्टेंबरला महारक्तदान शिबीर तर १८ सप्टेंबरला श्री दत्त मंदिर महाआरती व मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम पार पडेल. हे सर्व कार्यक्रम बाजार समितीच्या आवारात सकाळी दहाला होतील. कार्यक्रमांना सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सेवा सप्ताहात उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती योगेश पाटील, उपसभापती व संचालक मंडळाने केले आहे.