(पोळ्याच्या बातम्या क्लब कराव्यात)
---
NSK26H29279
जळगाव : जैन हिल्सवर बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान सर्जा-राजाला नैवेद्य अर्पण करताना जैन परिवारातील सदस्य.
---------
जैन हिल्सवर पारंपरिक बैलपोळ्याचा जल्लोष
उपशीर्षक
आदिवासी नृत्य, मल्लखांब प्रात्यक्षिकांची रंगत; वृषभराजाच्या मिरवणुकीचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : आदिवासींचे पारंपरिक होळी नृत्य.. मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके.. सालदार मंडळींचे उत्स्फूर्त पावरी नृत्य..अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना.. वृषभराजाची भव्य सवाद्य मिरवणूक.. अशा कृषीसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पोळा सण जैन हिल्स येथे थाटामाटात साजरा झाला.
या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, प्र- कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदोर मावोजो, राजेंद्र मयूर, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक अमर जैन, नगरसेविका वैशाली पाटील, अमित पाटील आदी उपस्थित होते.
कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषि विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवाप्रसंगी अशोक जैन व ज्योती जैन, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पूजन करण्यात आले.
हेलीपॅडच्या विस्तीर्ण मैदानावर पोहोचल्यानंतर वातावरणात उत्साहाचा नवा रंग भरला. डॉ. विजय माहेश्वरी, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून बैल पोळा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
१४-२
आदिवासी नृत्याविष्कार,
मल्लखांबची प्रात्यक्षिके
पारंपरिक वेशभूषेतील सालदारांचे नृत्य, आदिवासी बांधवांचे बहारदार पारंपरिक नृत्य आणि मल्लखांबच्या थरारक प्रात्यक्षिकांनी पोळा उत्सवात रंगत भरली. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जंगल परिसरातून आलेल्या ३५ आदिवासी बांधवांच्या समूहाने सादर केलेल्या पारंपरिक होळी नृत्याने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यातून मंगलमय वातावरण निर्मिती केली. जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साइटवर चालते. वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा अव्याहत सुरू ठेवली आहे. जैन इरिगेशनमधील सर्व सालदारगडींचा भेटवस्तू देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. किशोर कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
-----
(चौकट)
यांना पोळा फोडण्याचा मान
पोळाचा आनंद अजून द्विगुणीत व्हावा, यासाठी कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेने पोळा फोडणाऱ्या सालदारांना रोख पारितोषिक देण्यात येते. यावर्षी २० हजार रुपयांचे रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरीत झाले. त्यात भाऊंची सृष्टी येथील सालदार चिंटू नवलसिंग गोंड यांना पहिला मान मिळाला. गोशाळेचे सालदार वाल्मीक शिंदे यांना दुसरा मान मिळाला तर जैन सोसायटीचे सालदार सुरेश गरेसिंग पावरा यांना तिसरा मान मिळाला.
----------