(पान ४ अँकर)
29286/29287
नंदुरबार : ‘तनिष्का व्यासपीठा’तर्फे झालेल्या ‘श्रावणसरी’ कार्यक्रमात सहभागी महिला.
लोगो : तनिष्का
---------
मैत्रिणींच्या साथीने रंगला आनंद सोहळा
श्रावणसरी कार्यक्रम उत्साहात; खेळ, उखाणे अन् स्पर्धांची धमाल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १० : नऊवारी, दागिने, अंबाडा असा पारंपरिक साज... मराठमोळ्या गाण्यांवर रंगलेला फॅशन वॉक... सख्यांच्या साथीने रंगलेले मंगळागौरीचे खेळ अन् स्पर्धेसाठी चाललेली उखाणे-कवितांची चढाओढ, अशा धमाल मज्जा-मस्तीचे वातावरण नुकतेच येथे पाहायला मिळाले. रोजच्या रहाटगाड्यातून हवीहवीशी विश्रांती घेत महिलांनी मैत्रिणींच्या साथीने श्रावणसरींचा आनंद लुटला.
तनिष्का व्यासपीठातर्फे नुकताच हा कार्यक्रम झाला. पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्स यांचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. स्मित हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. तेजल चौधरी, पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्सचे नंदुरबार शाखेचे व्यवस्थापक किशोर राऊत आदी उपस्थित होते. शिवगर्जनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उखाणा स्पर्धा, मेंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सोलो डान्स, एक मिनिट खेळ, मराठमोळा फॅशन वॉक, समूह नृत्य या सर्व कार्यक्रमांत सर्व तनिष्का सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला गीता मेकओव्हर ॲन्ड ब्यूटी ॲकॅडमीच्या संचालिका गीता पवार, भक्तिनाद महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री वाणी, साईशा एस्थेटिक ब्यूटी स्टुडियोच्या संचालिका दीपाली महाले, खानदेशी लाड भूमिका बच्छाव, नेहा ब्यूटी ॲन्ड स्पाच्या संचालिका नेहा पारेख, प्राची आर्ट्स क्लासच्या प्राची निफाडकर यांनी परीक्षक म्हणून काम केले.
तनिष्काच्या जिल्हा समन्वयक वर्षा पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी कल्पना जाधव, ज्योत्स्ना कानडे, प्रांजल सोनवणे, सरिता ठाकूर आदींनी प्रयत्न केले. विशाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
------
स्पर्धेतील विजेते असे ः
ग्रुप डान्स स्पर्धा : ममता पाटील आणि ग्रुप (प्रथम), ज्योत्स्ना कानडे आणि ग्रुप (द्वितीय), प्रांजल सोनवणे आणि ग्रुप (तृतीय)
सोलो डान्स स्पर्धा : हर्षा चौधरी (प्रथम), प्रीती वाघ (द्वितीय), कल्पना भावसार (तृतीय), ममता पाटील, रितिका गायकवाड (उत्तेजनार्थ)
उखाणे स्पर्धा : सुशीला पानपाटील (प्रथम), पूनम बोरसे (द्वितीय), रितिका गायकवाड (तृतीय), रूपाली पाटील (उत्तेजनार्थ)
मराठमोळा फॅशन वॉक : प्रीती वाघ (प्रथम), तेजस्विनी राजपूत (द्वितीय), रितिका गायकवाड (तृतीय), हर्षा चौधरी, ललिता जाधव (उत्तेजनार्थ)
मेंदी स्पर्धा : रोशनी भुईंगळ (प्रथम), जयश्री पाटील (द्वितीय)
रांगोळी स्पर्धा : नेहा राजपूत (प्रथम), माधुरी बागूल (द्वितीय)