(कृपया आवश्यक घ्यावी) मस्ट
फोटो : 29289
नंदुरबार : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करताना विद्यार्थिनी.
-----------------------
के. आर. पब्लिक स्कूलमध्ये
पयार्वरणपूरक गणेशमूर्ती उपक्रम
नंदुरबार, ता. १० : येथील के. आर. पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी श्री गणेशमूर्ती निर्मितीचा प्रेरणादायी उपक्रम राबविला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कलात्मकतेने गणेशमूर्ती तयार केल्या. या सर्व मूर्ती पर्यावरणपूरक असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत असते. संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणींचे विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन मिळत असते. सिद्धार्थ वाणी यांच्या परिश्रमातून हा उपक्रम साकारला जात आहे. प्राचार्या छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी कौशल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कलेतून कौशल्य, कौशल्यातून आत्मविश्वास आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तींतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश’ देणारा शाळेचा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.