प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा

प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा
Published on
प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बैठकीत निर्धार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १० : राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय बैठकीत व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. ९) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष रोहितकुमार राजपूत यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. या वेळी महासंघाचे राज्य संघटक बाळासाहेब घोरपडे, आप्पासाहेब वानखेडकर व सुनील गायमुखे, राज्य सहचिटणीस आबासाहेब तांबे, विभागीय अध्यक्ष रमेश शिसव, विभागीय महिला उपाध्यक्षा सरोज जगताप, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रश्‍न व मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी राज्याच्या मुख्य सचिवांच्या माध्यमातून या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच बैठकीत संघटनेचा भाग असलेल्या दुर्गा महिला मंचाचे पुनर्गठण करण्यात आले. बैठकीप्रसंगी जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांचा सन्मान बैठकीमध्ये नाशिक जिल्हा तसेच विभागातून महासंघाच्या राज्य कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये विभागीय अध्यक्ष रमेश शिसव, विभागीय महिला उपाध्यक्षा जगताप, सहचिटणीस तांबे, नयना चौधरी, बाळासाहेब घोरपडे, वानखेडकर व गायमुखे यांचा समावेश होता. फोटो क्रमांक : एच-29294

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com