शनिवारी विज्ञानवारी उपक्रम

शनिवारी विज्ञानवारी उपक्रम
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H29211 धुळे : जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी विज्ञानवारी उपक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलतांना मविप धुळेचे अध्यक्ष किशोर पाटील. शेजारी प्रा. डॉ. आर. एम. शेवाळे, डी. व्ही. निकम, प्रा. उमेश पगारे आदी. --- विज्ञानाच्या गोडीसाठी ‘शनिवारी विज्ञानवारी’ --- मराठी विज्ञान परिषदेतर्फे उपक्रम; जयहिंदमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान विषयाची गोडी वाढावी आणि त्यांना विज्ञानातील विविध संकल्पनांची प्रत्यक्ष कृतीतून व प्रयोगातून माहिती मिळावी, या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेच्या धुळे विभागातर्फे दरवर्षी ‘शनिवारी विज्ञानवारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मंगळवारी (ता.८) शनिवारी विज्ञानवारी-२०२६-२७ या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाचे अध्यक्ष किशोर पाटील प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापक डी. व्ही. निकम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपक्रमाचे मुख्य संयोजक तथा मविपचे कार्यवाह प्रा. डॉ. आर. एम. शेवाळे युवाविज्ञान प्रसारक समन्वयक प्रा. उमेश पगारे उपस्थित होते. मविपचे अध्यक्ष पाटील, मुख्याध्यापक निकम यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘शनिवारी विज्ञानवारी’ उपक्रमाच्या शालेय समन्वयक अर्चना पाटील (जयहिंद इंग्लिश मिडिअम स्कूल), प्रियंका सोनवणे (राजे छत्रपती संभाजी हायस्कूल), कविता पाटील (स्वामी टेऊराम हायस्कूल), प्रियंका दुसाणे (जयहिंद हायस्कूल व जुनिअर कॉलेज), मराठी विज्ञान परिषदेची पदव्युत्तर स्कॉलरशिप मिळविलेले विद्यार्थी अनम अन्सारी व तारिक हुसेन तनवीर मलिक, निवड झालेले आठही युवा विज्ञान प्रसारक, जयहिंद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. शर्मिला निकुंभे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा. डॉ. शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. सुनिता साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. विज्ञान शिक्षिका प्रियंका दुसाणे यांनी आभार मानले. ३१ डिसेंबरपर्यंत सत्र यावर्षी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे विज्ञान महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील आठ विद्यार्थ्यांची ‘युवा विज्ञानप्रसारक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. ते धुळे शहरातील निवडलेल्या चार शाळेत विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतील. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक शाळेत दर शनिवारी एक अशी एकूण दहा सत्रे होतील. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com