धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H29190
धुळे : डीजेसह लेझर लायटिंगला जिल्ह्यात कायमस्वरुपी बंदी घालावी यासह इतर मागण्यांचे निवेदन अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांना देतांना महानगर नागरी हक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी, नागरीक.
---
डीजेसह लेझरला कायमस्वरुपी बंदी घालावी
---
महानगर नागरी हक्क संघर्ष समितीची पोलिस अधीक्षकांकडे मागणी; रस्तेही पूर्णतः बंद नको
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : जिल्ह्यात फक्त गणेशोत्सवापुरती नव्हे तर कायमस्वरूपी डिजे व लेझर लायटींगसाठी बंदी घालावी तसेच गणेशोत्सवासह इतरवेळीही शहरातील रस्ते पूर्ण बंद होणार नाहीत यादृष्टीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी महानगर नागरी हक्क संघर्ष समितीने पोलिस अधीक्षकांकडे केली.
कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकांमध्ये यापुढे डीजे वाजविता येणार नाही असा महत्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. या आदेशानुसार गृह खात्याने राज्यातील सर्व पोलीस प्रमुखांना कुठल्याही मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यास परवानगी देवू नये व डीजे वाजविल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेशदिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गणेशोत्सवात आपण करत आहात त्याचे स्वागत आहे. मात्र, ही बंदी फक्त गणेशोत्सवापुरती नको. तर कायमस्वरूपी डीजे आणि लेझर लायटिंगला बंदी घालावी, अशी मागणी समितीने निवेदनातून केली आहे.
आरोग्याला धोका
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आतापर्यंत अनेकजण ह्रदयविकाराच्या झटक्याने आणि ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. काहींना कायमस्वरूपी बहिरेपणा आलेला आहे. तसेच, डीजेसोबत असलेल्या लेझर किरणांमुळे अनेकांचे डोळे खराब झाले आहेत. त्यामुळे डीजेची परवानगी देवू नये. मिरवणुका आणि उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यासाठी संबंधितांना प्रवृत्त करावे असेही समितीने म्हटले आहे.
रस्ते पूर्णतः बंद नको
काही गणेश मंडळे रस्त्यावर मंडप उभारून संपूर्ण रस्ता बंद करतात. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर मंडप उभारताना बाजूला एक- दोन चारचाकी वाहन जाईल एवढी जागा वाहतुकीसाठी मोकळी सोडण्याचे आदेश गणेश मंडळांना द्यावेत, अशीही मागणी समितीने निवेदनातून केली आहे. समितीचे निमंत्रक कैलास हजारे, संजय बगदे, ॲड. चंद्रकांत येशीराव, पप्पू सहानी, बिपिन अमृतकर, संदीप शेवतकर, श्रीकृष्ण बेडसे, रामकृष्ण शिंदे, मुकेश गुप्ता, सचिन सोनवणे, भगवान वाघ, किशोर बोरसे, देविदास शिरुडे, चंद्रकांत सैंदाणे, धनंजय गाळणकर आदींनी मागणीचे निवेदन अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांना दिले.
---