कासारे दुकान आग

कासारे दुकान आग
Published on
धुळे : टुडे पान १ साठी... -- फोटो क्रमांक : 29302 कासारे : गणेश प्लायवूड व फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत जाळून खाक झालेली यंत्रसामग्री. -- कासारेत फर्निचर दुकानाच्या आगीत पाच लाखांचे नुकसान -- मध्यरात्री पत्रा उचकून दुकानात अज्ञात व्यक्तीचा प्रवेश -- सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १० : कासारे (ता. साक्री) येथील विश्वकर्मा चौकातील गणेश प्लायवूड व फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. ९) मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दुकानातील फर्निचर साहित्य व यंत्रसामग्री जळून खाक झाली असून सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत अज्ञात व्यक्तीने दुकानाचा पत्रा लोखंडी सळईने उचकून आत प्रवेश केला आणि साहित्याला जाणीवपूर्वक आग लावली, असा संशय व्यक्त होत आहे. या आगीत सुमारे ४० लाकडी मंदिरे, ३५ दरवाजे, २२ टीपॉय, ३३ दरवाजांच्या चौकटी, सात फुटी लाकडी पट्ट्यांचे ९० नग आणि सात बाय सात फुटांच्या फर्निचर कपाटांचे चार नग जळून भस्मसात झाले आहेत. तसेच फर्निचर निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन कटर मशिन, दोन ग्राइंडर, दोन ड्रिल मशिन, दोन बोअर मशिन यांसह अन्य मौल्यवान अवजारे आगीत खाक झाल्याने व्यावसायिक कामाचे अतोनात नुकसान झाले आहे. या प्रकरणी दुकानमालक विनोद सोनवणे यांनी साक्री पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविली आहे. आग लावण्यामागील नेमक्या कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून, भरवस्तीतील या घटनेमुळे कासारे परिसरात चिंता व हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com