NSK26H29303 (प्रशांत पाटील)
NSK26H29304 (संजय देवरे)
----
शनिपेठ मित्र मंडळ साकारणार
एकाच ठिकाणी ३० गडकिल्ले
उपशीर्षक
दुर्गसंवर्धनाचा संदेश देणार; अध्यक्षपदी प्रशांत पाटील
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१० : शहरातील मानाचे आणि शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या शनीपेठ मित्र मंडळाचे यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. मंडळाच्या ५० व्या वर्षाचे औचित्य साधून यंदा भव्य आणि ऐतिहासिक देखाव्याची पर्वणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन हे यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे अतुलनीय शौर्य, दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेले गडकिल्ले नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने मंडळाने ही अनोखी संकल्पना साकारली आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार असून, जळगावकरांना एकाच ठिकाणी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडणार आहे.
१४-१
दुर्ग संवर्धनासोबत स्वच्छतेचा संदेश
केवळ ऐतिहासिक देखावा साकारण्यापुरती मंडळाची भूमिका मर्यादित नसून, गडकिल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि दुर्गभ्रमंतीदरम्यान स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. युवकांनी पुढाकार घेऊन दुर्गसंवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
-------
(चौकट)
नूतन कार्यकारणी जाहीर
मंडळाच्या कार्यकारिणीत अध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष शांताराम पाटील, प्रभाकर महाले, सचिव : संजय देवरे, कार्याध्यक्ष अनिल वाणी, मुकुंदा सोनवणे, उत्सव समिती प्रमुख जगदीश नेवे, मिरवणूक प्रमुख देवीदास जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
----------