NSK26H29307
पिलखेडा : पोळा उत्सवानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी रोहन घुगे. समवेत कृषी विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ.
परंपरा जपत आधुनिक,
नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
जिल्हाधिकारी घुगे : पिलखेड्यात पोळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१० : पोळा हा बळीराजाचा उत्सव परंपरा आणि श्रद्धेने साजरा करताना शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच निसर्गपूरक पद्धतींची जोड देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
पिलखेडा येथे कृषी विभाग आणि ‘आत्मा’च्या संयुक्त विद्यमाने पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी शेतकऱ्यांसोबत पोळा साजरा केला. तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानातील लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी पारंपरिक शेतीसोबत नैसर्गिक व सेंद्रिय निविष्ठांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. दरम्यान, पिलखेडा येथे जैव निविष्ठा संसाधन केंद्राचा (बीआयआरसी) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, तालुका कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, मंडळ कृषी अधिकारी शरद पाटील, उप कृषी अधिकारी योगेश अत्रे, सरपंच रोहिणी साळुंखे आदी संख्येने उपस्थित होते.