ॲंकर
NSK26H29323, NSK26H29324
जळगाव : विवेकानंद स्कूलमध्ये बैलपोळ्यानिमित्त करण्यात आलेली सजावट व न्याहाळताना विद्यार्थी.
--
परंपरेचा सन्मान अन् मातृत्वाचा गौरव
विवेकानंद स्कूलमध्ये बैलपोळा, मातृदिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बैलपोळा व मातृदिन उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि आईच्या ममत्वाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने शाळेच्या सभागृहात विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात बैलांच्या सजावटीचे साहित्य, पारंपरिक वस्तू, विविध खाद्यपदार्थ यांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. तसेच ‘आईचे विविध रूप’ या विषयावर आधारित पोस्टर्सच्या माध्यमातून आईच्या प्रेमळ, कर्तव्यदक्ष आणि बहुआयामी भूमिकेचे दर्शन घडविण्यात आले.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘आईची दिवसभरातील विविध रूपे’ या विषयावर छोटेखानी भूमिकानाट्य सादर केले. आई घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाच मुलांची काळजी कशी घेते, याचे सुंदर सादरीकरण विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून केले. त्यांच्या निरागस अभिनयाने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी सौ. मंजुषा साळुंखे दीदी यांनी बैलपोळा व मातृदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या व सुंदर पद्धतीने समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन राजेश्वरी दीदी व कुमुदिनी पाटील यांनी केले. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता शिंपी दीदी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भारतीय संस्कृती, परंपरा आणि मातृत्वाचा सन्मान करण्याचा सुंदर संदेश दिला.