धुळे ः टुडे १ साठी, ॲंकरच्या शेजारी
--
फोटो घ्यावा...उदय सामंत
--
धुळ्यात आज जिल्हा गुंतवणूक परिषद
--
उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रावल यांची उपस्थिती
--
किंवा
--
उद्योगमंत्र्यांच्या हस्ते आज
गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन
--
धुळ्यात पालकमंत्र्यांचीही उपस्थिती
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : उद्योग आयुक्तालय, नाशिक विभागीय उद्योग व सेवा सहआयुक्तालय आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे जिल्ह्यात नव्या गुंतवणुकीला आकर्षित करून उद्योग, रोजगार आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना देण्याच्या उद्देशाने धुळे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात शुक्रवारी (ता. ११) सकाळी दहापासून ही परिषद असेल.
-
उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल अध्यक्षस्थानी असतील. खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजीत तांबे तसेच आमदार मंजुळा गावित, अनुप अग्रवाल, काशिराम पावरा, राघवेंद्र भदाणे उपस्थिती असतील.
-
उद्दिष्ट व संकल्पना
जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक प्रयत्न या संकल्पनेवर ही परिषद आधारित आहे. उद्योग क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करणे, जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या नव्या संधी उद्योजकांसमोर आणणे, तसेच नवीन उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करून आर्थिक विकासाला गती देणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, मैत्री विशेष आयुक्त वैभव वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उद्योजक, गुंतवणूकदार तसेच औद्योगिक क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त संतोष गवळी, नाशिक विभागीय सहआयुक्त वृषाली सोने यांनी केले आहे.
-