शिंपी समाजातील ज्ञान ज्योती पुरस्कार वितरण सोहळा अखंड ३० वर्षापासून शिरसाठे परिवारा तर्फे संपन्न

शिंपी समाजातील ज्ञान ज्योती पुरस्कार वितरण सोहळा अखंड ३० वर्षापासून शिरसाठे परिवारा तर्फे संपन्न
Published on
NSK26H29345 जळगाव : ज्ञान ज्योती पुरस्काराने सत्‍कारार्थी विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्‍यवर. --- शिंपी समाजातील गुणवंतांना ज्ञान ज्योती पुरस्कार वितरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : शिक्षकदिनी ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा झाला. यात शिंपी समाजातील दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ज्ञान ज्‍योती पुरस्‍कार देऊन करण्यात आला. शिरसाठे परिवारातर्फे गेल्‍या ३० वर्षापासून ज्ञान ज्योती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावेळी मान्यवरांचा सत्कार आयोजकांमार्फत संत शिरोमणी नामदेव महाराज चरित्र व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. जीवन ज्योती आयोजनामध्ये दरवर्षी नवीन एक शाळा व त्यातील वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सुकलाल देवचंद सिरसाठे यांच्या स्मृतीनिमित्त केले जाते. तसेच ज्ञानज्योती पुरस्कार शांताराम सुकलाल शिरसाठे यांच्या स्मरणार्थ शिंपी समाजातील शिक्षण क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती स्मृतीचिन्ह व संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन चरित्र पुस्तिका देऊन करण्यात आला. यात यंदा दहावीतील विद्यार्थी उत्कर्ष नेरपगार, धनश्री शिंपी व कोमल देवरे, बारावीतील दिशा शिंपी, पदवीधरमधून ऋचा जाधव, पदविकाधारकमधून निधी जाधव, तसेच आकांक्षा शिरसाठे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्रीमती शकुंतला टोके शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापिका भावना पाटील, आशा फाउंडेशनच्‍या संचालिका सुजाता बोरकर, अभेद्या फाउंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे, राकेश शिरसाठे, रश्मी शिरसाठे व मीना शिरसाठे आदी उपस्‍थीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com