कुटुंबांचा चरितार्थ कुटुंबांचा चरितार्थ

कुटुंबांचा चरितार्थ कुटुंबांचा चरितार्थ
Published on
टुडे ३ ॲंकर ------ NSK26H29346 जळगाव : ‘उमेद’च्या महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उभारलेले बैलपोळा साहित्य विक्रीचे स्टॉल. ------ बैलपोळा स्टॉलमधून ४० कुटुंबांचा चरितार्थ ‘उमेद’च्या महिला स्वयंसहाय्यता समूहांना मोठी बाजारपेठ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : ग्रामविकास व पंचायत राज विभाग जळगाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ अंतर्गत बैलपोळा सणानिमित्त महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनासाठी विशेष स्टॉलचे आयोजन करण्यात आले. या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमातून निर्माण झालेल्या व्यवसायामुळे तब्बल ४० कुटुंबांचा चरितार्थ चालण्यास हातभार लागला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई यांच्या संकल्पनेतून, मार्गदर्शनाने बैलपोळा सणानिमित्त प्रभाग समन्वयक हेमांगी टोकेकर यांनी महिला स्वयंसाह्यता समूहाना मार्गदर्शन करून सदर स्टॉल दिले. टोकेकर म्हणाल्या, की ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी विविध वस्तू तयार करून त्या ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी स्टॉल उभारला. उमेद अभियानाचे हे नाथ समाजातील ११ महिला स्वयंसहाय्यता समूह वर्षभर सूतकाम, मोरखी, जेठे, आरसे, जेतपान, इत्यादी वस्तू बनवून तब्बल ४० कुटुंबांचा चरितार्थ चालवतात. ही प्रेरणादायी बाब ठरली आहे. तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी, टोकेकर यांच्या मार्गदर्शनाने दोधुनाथ, साईबाबा, जय संतोषी माता, बहिरमबाबा, वैभवलक्ष्मी, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, एकनाथबाबा, सिद्धिविनायक, जय जननी, श्री गणेश या ११ महिला स्वयंसहाय्यता समूहांनी स्टॉल लावून आपले विक्री आणि प्रदर्शन केले. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com