NSK26H29361
जळगाव : गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवर.
–––
विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : केसीईएसच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ सीओईएमच्या वतीने गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गणपतीमूर्ती निर्मिती कार्यशाळा व स्पर्धेत १७४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविल्या.
गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेसाठी दिव्या पमनानी यांची विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कला प्रत्यक्ष शिकविताना मूर्तीनिर्मितीतील विविध बारकावे समजावून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीला कलात्मक आकार देत आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. कार्यशाळेला व्यवस्थापन पदव्युत्तर, पदविका आणि अभियांत्रिकी विभागातील तब्बल १७४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या कल्पकतेचा आणि कलाकौशल्याचा आविष्कार सादर केला.
कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. प्राजक्ता पाटील, सुनील विसपुते यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी समन्वयक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
चौकट
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे
कार्यशाळेसोबतच गणपतीमूर्ती निर्मिती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व १७४ विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.