फोटो : NSK26H29362
नंदुरबार : ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभेत बोलताना प्रतापराव चव्हाण. शेजारी संस्थेचे अध्यक्ष वसंत चौधरी, राधेश्याम सोनार, सोमनाथ शिंपी, राजाराम निकम, के. डी. गिरासे, देवकन्या सोनार, रंजना शिंपी, लता टेंभेकर.
---------
शासनाच्या सवलती ज्येष्ठांपर्यंत पोहचाव्यात
प्रतापराव चव्हाण : ज्येष्ठ नागरीक संस्थेची सभा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १२ : ग्रामीण भागात संघाचा विस्तार वाढविला पाहिजे. खेड्या- पाड्यातून संघ स्थापन करून शासनाच्या सवलती सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजे, असे प्रतिपादन नंदुरबार ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रतापराव चव्हाण यांनी केले.
तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा शहरातील श्री दंडपाणेश्वर येथील सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष वसंतराव चौधरी होते. सोमनाथ शिंपी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. सचिव राधेश्याम सोनार यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त व संस्थेचा अहवाल सादर करून मंजूर केला. वयाची ८० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा या वेळी सत्कार करण्यात आला. नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालाची चव्हाण यांनी या वेळी प्रशंसा केली. फेस्कामचे संघटन सचिव कोमलसिंग गिरासे यांनी सभेला संबोधीत केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही मार्गदर्शन केले. ज्येष्ठ दिव्यांग नागरिकांसाठी सर्व प्रकारचे साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महिला आघाडीच्या अध्यक्षा देवकन्या सोनार यांनीही सभेला मार्गदर्शन केले.
कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी यांनी आभार मानले. सभा यशस्वीतेसाठी राजाराम निकम सहसचिव, कोषाध्यक्ष दरबारसिंग गिरासे, देविदास वसईकर, रामा बुधा, दत्तात्रेय शिंपी, अनिल शंकरराव चौधरी, रवींद्र रघुवंशी यांनी परिश्रम घेतले.