तोरणमाळमध्ये पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

तोरणमाळमध्ये पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
Published on
पान एक ॲंकर --------------- 29373 नंदुरबार : तोरणमाळ येथील विविध स्थळांची पाहणी करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, डॉ. मिताली सेठी. ---------------------- पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ : तोरणमाळला भेट देत कामांची पाहणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ११ : सातपुडा पर्वतरांगेतील निसर्गरम्य तोरणमाळ पर्यटनस्थळाचा विकास करताना निसर्गाचा समतोल राखावा तसेच पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. मुश्रीफ यांनी तोरणमाळला भेट देऊन पर्यटन विकास आराखड्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, उपवनसंरक्षक श्री. सस्ते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तोरणमाळ येथील यशवंत तलाव परिसराचा विकास, मुलांसाठी विविध मनोरंजनाची साधने, नौकानयन आदी उपक्रमांचा समावेश करावा. सातपुडा पर्वतरांगांचा नैसर्गिक ठेवा जपत वाहनतळ, पदपथ, आवश्यक बांधकामे तसेच पर्यटकांसाठी निवास व भोजन व्यवस्था विकसित करावी. पर्यटकांना सुखकर आणि सुरक्षित सुविधा मिळतील, यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांचे योग्य नियोजन करावे. पर्यटन विकास करताना निसर्गाचा समतोल आणि परिसराचे पर्यावरण अबाधित राहील, याला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी तोरणमाळ येथील सीताखाई, यशवंत तलाव यांसह विविध पर्यटन स्थळांची पाहणी पालकमंत्री यांनी करतसंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी विकासकामांची माहिती घेतली. यावेळी महसूल, जिल्हा परिषद, नियोजन तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी तोरणमाळ पर्यटन विकासासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती दिली. पर्यटकांना स्थानिक पातळीवर निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘होम स्टे’ मॉडेल तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com