धुळे टुडे २ साठी अँकर...
---
NSK26H29372
नवी दिल्ली ः नॅशनल स्कूल ॲवॉर्डस संस्थेतर्फे उत्कृष्ट स्कूल हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार शिखा ढिल्लोन, सांताराम प्रभाकर यांच्या हस्ते स्वीकारताना हस्ती स्कूलचे संचालक मयंक जैन.
---
हस्ती पब्लिक स्कूलला राष्ट्रीय पुरस्कार
नॅशनल स्कूल ॲवॉर्डसतर्फे ‘उत्कृष्ट स्कूल’ पुरस्कार; नवी दिल्लीत सन्मान
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ ः हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित दोंडाईचा (दाऊळ शिवार) येथील हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजला नॅशनल स्कूल ॲवॉर्ड या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील भविष्यातील शिक्षणासाठी ‘उत्कृष्ट स्कूल’ पुरस्कार प्राप्त झाला.
नॅशनल स्कूल ॲवॉर्ड संस्थेमार्फत ६ सप्टेंबरला नवी दिल्लीतील वेलकम हॉटेल येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. नॅशनल स्कूल ॲवॉर्डच्या फाउंडर डायरेक्टर शिखा ढिल्लोन, लोकसभेचे निवृत्त सहसंचालक सांताराम प्रभाकर यांच्या हस्ते हस्ती पब्लिक स्कूलचे संचालक मयंक जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नॅशनल स्कूल ॲवॉर्ड ही संस्था संपूर्ण भारतातील शाळा, शिक्षक, प्राचार्य व संचालक या विविध घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या संस्थेमार्फत गौरव केला जातो. शिक्षणातील गुणवत्ता, प्रभावी अध्यापन पद्धती, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि भविष्यातील शिक्षणासाठी शाळांची तयारी आदी विविध घटकांचा पुरस्कारासाठी विचार केला जातो. शाळांना नव्या कल्पना आणि उत्तम पद्धती स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हा या संस्थेचा उद्देश आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या सन्मानामुळे हस्ती पब्लिक स्कूलच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांपर्यंत मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण, सर्जनशील विचार आणि बदलत्या जगाशी जुळवून ठेवत आहे, तसेच भविष्यातील पिढीला सक्षम, आत्मविश्वासपूर्ण शिक्षण देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे. या राष्ट्रीय पुरस्काराच्या सन्मानाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योगपती अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन कैलास जैन, संचालक मंडळ, प्राचार्या रजिया दाऊदी यांनी शाळेच्या सर्व संबंधितांचे कौतुक केले.
---
चौकट
५३ पेक्षा जास्त पुरस्कार
यापूर्वी हस्ती स्कूलला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील ५३ पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नॅशनल स्कूल ॲवॉर्ड या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराच्या सन्मानामुळे हस्तीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.