घरोघरी बाप्पा उपक्रम

घरोघरी बाप्पा उपक्रम
Published on
धुळे टुडे २ साठी... --- ‘घरोघरी गणराय’ उपक्रमात सहभागी व्हा महापालिकेचे सार्वजनिक गणेश मंडळे, नागरिक, संस्था, कलाकार, कारागिरांना आवाहन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक अस्मितेचे आणि गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासोबतच गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा, तसेच अन्य जागतिक मानांकने प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत घरोघरी गणराय उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, संस्कृती, परंपरा, लोकजीवन, ज्ञान, हस्तकला, कौशल्ये, खाद्य परंपरा आणि सांस्कृतिक वारसा देश-विदेशात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमाला व्यापक लोकसहभाग मिळावा, यासाठी धुळे शहरातील नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, कलाकार, कारागीर आणि लोककलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. गणेशोत्सवाची परंपरा नोंदवा धुळे शहरातील वैशिष्ट्यपूर्ण, पारंपरिक, तसेच पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या घरगुती गणेशोत्सवांची माहिती ‘घरोघरी गणराय’ या संकल्पनेअंतर्गत Bappa.org या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवायची आहे. नागरिकांनी आपल्या घरातील गणेश प्रतिष्ठापना, कौटुंबिक परंपरा, पूजा पद्धती, पारंपरिक विधी, कला व सजावट, खाद्यपरंपरा, जुन्या आठवणी, छायाचित्रे, व्हिडिओ, तसेच गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण कथा Bappa.org वर नोंदवावी. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना शासनामार्फत Digital Cultural Preserver Certificate देण्यात येणार आहे. धुळेकरांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक ठेवा या माध्यमातून नोंदवून महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेच्या दस्तऐवजीकरणात योगदान द्यावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मंडळांनी पुढाकार घ्यावा धुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मंडळाचा इतिहास, स्थापना वर्ष, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम, सजावट, जुन्या आठवणी, छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, निवासी संघटना, महिला बचत गट, तसेच विविध संघटनांनी Bappa.org ची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवावा. कलेची नोंद करावी धुळे शहरातील चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, लोककलावंत, संगीतकार, हस्तकला कारागीर, रांगोळी कलाकार, फुलसजावटकार, पाककला क्षेत्रातील व्यक्ती, तसेच विविध पारंपरिक कला-कौशल्ये जोपासणाऱ्या कलाकारांनी या अभियानात सहभागी व्हावे. कलाकार आणि चौसष्ट कलांशी संबंधित कौशल्यांची नोंद करण्यासाठी Kaladhipati.com हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. सांस्कृतिक वारशाला स्थान शहरातील ऐतिहासिक किंवा वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरे, पारंपरिक मूर्तिकार, गणेशमूर्ती घडविणाऱ्या कार्यशाळा, स्थानिक लोककला, खाद्यपरंपरा, गणेशोत्सवाशी संबंधित जुन्या आठवणी, तसेच शहराच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडित बाबींची माहितीही या अभियानाच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com