सर्व फोटो वापरावेत
NSK26H29380 (राजेश महाजन)
NSK26H29381 (गजानन इंगळे)
NSK26H29382 (धिरज ढाके)
NSK26H29383 (नीलम जोशी)
----
‘सायबर’ सुरक्षा, ‘डिजिटल’ सतर्कतेवर देखावा
(उपशीर्षक)
जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : जळगाव जनता सहकारी बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील ३४ वर्षांपासून सामाजिक जनजागृतीच्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते. त्यानुसार यंदाच्या उत्सवात सायबर सुरक्षा व डिजिटल सतर्कता यावर देखावा सादर केला जाणार आहे.
जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात यावर्षीची कार्यकारिणी व समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत मंडळाने धार्मिक सामाजिक सांकृतिक देखावे सादर केले आहे. मागील वर्षी बँकेच्या वतीने पंचपरिवर्तन आधारित कुटुंब प्रबोधन, सामाजिक समसरता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य, स्वबोध या पंचसूत्रीतून सजीव देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले होते. या देखाव्यास मंडळाला महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
मंडळाची कार्यकारणी
अध्यक्ष राजेश महाजन, उपाध्यक्ष गजानन इंगळे, सचिव धिरज ढाके, खजिनदार नीलम जोशी, कार्याध्यक्ष राकेश पाटील, कार्यकारिणी सदस्य विशाखा पटेल, कपिल मराठे, योगेश चोपडे, प्रणव जोशी, जान्हवी सपकाळे, कृतिका पाटील, परेश नारखेडे, निवृत्ती माळी, नितीन सुलक्षणे, वैभव बंगाली, घनश्याम धाडकर, शुभम पवार. तसेच केशवस्मृती सेवा संस्था समूहातील सर्व सदस्यांचा देखील यात सहभाग असणार आहे. मंडळाच्या सल्लागार समितीत डॉ. भरत अमळकर, सतीश मदाने, अनिल राव, संजय बिर्ला, नितिन झंवर, डॉ. आरती हुजूरबाजार, हरिषचंद्र यादव, डॉ. विलास रेलन आदींचा समावेश आहे.