थॅलेसेमिया-सिकलसेल शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी

थॅलेसेमिया-सिकलसेल शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी
Published on
29394 नंदुरबार : थॅलेसिमिया व सिकलसेल तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित राजेंद्रकुमार गावित, डॉ. विभूती गावित, रणजीत राजपूत आदी. -थॅलेसेमिया-सिकलसेल शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ११ : येथील पी. डी. गावीत आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल आणि जनकल्याण रक्त संकलन केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया व सिकलसेल शिबीर घेण्यात आले. शिबीरात २१० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी राजेंद्रकुमार गावीत, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विभुती गावीत, जनकल्याण रक्त संकलन केंद्राचे जनसंपर्क अधिकारी रणजित राजपूत, प्राचार्य डॉ. समीर चौधरी उपस्थित होते. के. डी. गावीत शैक्षणिक संकुलातील बी.एस्सी. नर्सिंग, डी. फार्मसी, बी.ए.एम.एस., जी.एन.एम., ए.एन.एम.तसेच फिजिओथेरपी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. थॅलेसेमिया व सिकलसेल हे आनुवंंशिक रक्तविकार असून, त्यांची वेळीच तपासणी करणे महत्त्वाचे असल्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विवाहपूर्व रक्त तपासणीचे महत्त्व समजावून सांगत या आजारांबाबत समाजात जनजागृती करून पुढील पिढीला सुरक्षित करण्याचा संदेश देण्यात आला. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. विजया वाघ, डॉ. खुशबू पटेल, एच. आर. फिलिप्स, चंदा पाडवी आणि संदीप पावरा यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com