फोटो : 29396
मुंबई : मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत
नाशिकचा राज्यस्तरीय गौरव
मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रताप पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात आयोजित ‘राष्ट्रीय पोषण माह’च्या शुभारंभ सोहळ्यात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते व विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख यांचे उपस्थितीत महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी विजय पचलोरे जिल्हा समन्वयक अश्विनी केदार उपस्थित होते.
प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती महिला यांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये व दुसऱ्या वेळी मुलगी झाल्यास सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. जिल्ह्यात या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत ५७०५ अंगणवाड्यांपर्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.