धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त
---
सूचना ः टॉपच्या जाहिरातीजवळ बातमी लावल्यानंतर त्या खाली संक्षिप्त घ्यावे.
---
खोपडेंच्या नियुक्तीबाबत
महापौर परदेशी यांना पत्र
धुळे : उच्च न्यायालयाचा आदेश, संख्याबळ या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनाप्रणीत शहर विकास आघाडीचे नगरसेवक दीपक खोपडे यांची महापालिका विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, अशी मागणी शहर विकास आघाडीने महापौर मायादेवी परदेशी यांना पत्र देऊन केली आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते शाहबाज शाह यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या स्थापन शहर विकास आघाडी या गटाचा गटनेता असून, आमच्यातर्फे विभागीय आयुक्तांकडे १३ सदस्यांची नोदणी झाली आहे. महापालिका अधिनियमानुसार आमचा गट संख्येने मोठा आहे. तसेच उच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर ‘मेरीट''च्या आधारावर महापालिकेने लवकर विरोधी पक्षनेता निवडीबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तांकडे आमच्या गटाच्या नोंदणीत आमचा गट मोठा असल्याने महापौरांनी गटाचे दीपक खोपडे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करावी. नगरसेवक धीरज कलंत्री, शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे, डॉ. सर्फराज अन्सारी, तुषार नवले आदी उपस्थित होते.
---
नवीन स्मार्ट मीटर;
अभियंत्यास मारहाण
धुळे : नवीन स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना धुळे शहरातील डोंगरे महाराज नगरात घडली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे पारोळा रोड कक्षाचे सहायक अभियंता आकाश मनोजराव बावणे (वय २८, रा. प्रभातनगर, देवपूर, धुळे) हे ९ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास डोंगरे महाराज नगरात शासकीय कर्तव्यावर असताना नवीन स्मार्ट मीटर लावत होते. त्या वेळी दोघांनी नवीन स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला. त्यांनी अभियंता बावणे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर सहायक अभियंता बावणे यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला.