पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा

पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा
Published on
फोटो : NSK26H29403 नंदुरबार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देतांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे. शेजारी डॉ. योगेश पाटील, मधुकर पाटील, निंबा माळी, योगेश चौधरी आदी. ----------- पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा राष्ट्रवादी कॉंग्रेसची पालकमंत्र्यांकडे मागणी नंदुरबार, ता. १२ : तालुक्यातील सिंदगव्हाण, कलमाडी, कानडदे, विखरण, खोंडामळी, काकरदे यासह विविध गावांमध्ये विविध पवन ऊर्जा कंपनीची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे परिसरातील स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, पवन ऊर्जा कंपन्यांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू आहेत. स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी याठिकाणी उपलब्ध व्हाव्यात. स्थानिक नागरिकांना विविध कामांचे ठेके व उपकंत्राटे देण्यात यावेत. तसेच, संबंधित कंपन्यांच्या कामांमुळे गावांमध्ये तसेच शेतशिवारातून जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अवजड वाहनांची सततची वाहतूक व प्रकल्पाच्या कामांमुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्याचा त्रास शेतकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. कंपन्यांनी गावातील व शेतशिवारातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरूस्त करून द्यावेत. भविष्यात रस्त्यांचे नुकसान झाल्यास त्याची योग्य ती दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीने घ्यावी. कंपन्यांकडून सकारात्मक कार्यवाही होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, तालुकाध्यक्ष डॉ. योगेश पाटील, मधुकर पाटील, योगेश चौधरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com