सामंत यांना निवेदन

सामंत यांना निवेदन
Published on
धुळे ः टुडे १ साठी --- फोटो क्रमांक ः 29408 धुळे ः मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ. --- हैदराबाद, सातारा गॅझेटचा अंमल करा सकल मराठा समाजातर्फे उद्योगमंत्री सामंत यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः मराठा आरक्षणासाठी हैदराबाद व सातारा गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करून याप्रश्‍नी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांना आज येथे देण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे भानुदास बगदे, विनोद जगताप, भय्या शिंदे, मनोज ढवळे, निंबा मराठे, हेमंत भडक, भानुदास चौधरी, सुरेश पवार, प्रफुल्ल माने, रवींद्र नागणे, श्याम रायगुडे, अ‍ॅड. दिनेश काळे, बाळासाहेब ठोंबरे, उल्हास पाटील, राकेश भोसले, अशोक बाबर, अरुण मराठे, अशोक चव्हाण, अर्जुन पाटील, आबा कदम, किशोर वाघ, गोविंद वाघ, वामन मोहिते, मुकुंद शिंदे, अमर फरताडे, श्याम निरगुडे, मनोज रुईकर आदींनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला पूर्ण कल्पना असूनही मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत टाळाटाळ केली जात आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे. मंत्री उदय सामंत यांनी स्वतः त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून मागण्या मान्य केल्या होत्या; मात्र अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. धुळे जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीत किंवा शासकीय कार्यालयात कुणबी नोंदींची यादी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने समाज व जरांगे-पाटील यांची दिशाभूल केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी तातडीने पुढाकार घेऊन सर्व मागण्यांची पूर्तता करावी. उपोषणामुळे जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास अथवा मुंबईत होणाऱ्या आगामी मोर्चाच्या परिस्थितीस सरकारच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशाराही सकल मराठा समाजाने येथे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com