फोटो क्रमांक ः 29409
धुळे : ग. स. बँकेच्या अध्यक्षपदी शशांक रंधे, उपाध्यक्षपदी बापूराव पाटील यांचा सत्कार करताना लोकमान्य पॅनेलचे संचालक व सहकारी.
---
ग. स. बँक अध्यक्षपदी शशांक रंधे
---
बापूराव पाटील उपाध्यक्ष; बिनविरोध निवडीनंतर जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ ः धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या (ग. स. बँक) अध्यक्षपदी शशांक रंधे, तर उपाध्यक्षपदी बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच समर्थकांनी बँकेच्या आवारात जल्लोष करून आनंदोत्सव केला.
बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत गटनेते निशांत रंधे व भय्यासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखालील लोकमान्य सहकार पॅनेलने सर्व जागांवर दणदणीत विजय मिळवून वर्चस्व सिद्ध केले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. ११) झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित संचालकांनी एकमताने शशांक रंधे, बापूराव पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बँकेच्या सभासदांचा विश्वास सार्थ ठरवत बँकेला प्रगतिपथावर नेण्यासाठी आणि कर्मचारी व सभासदांचे हित जपण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रक्रियेत शिरपूरचे सहाक निबंधक राजेंद्र विरकर यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना अमोल यंडाईत व नागेश पुकळे यांनी सहकार्य केले.
माजी चेअरमन सी. एन. देसले, पतसंस्थेचे गटनेते विनोद खैरनार, संदीप पवार, चुनिलाल अहिरे, बबन नगराळे, संजय पवार, निंबा माळी, चंद्रकांत सत्तेसा, अशोक पवार, संचालक प्रशांत बोरसे, प्रवीण भदाणे, सोनाली भामरे, भूपेंद्र बाविस्कर, दीपक अहिरे, बिपिनचंद्र सोनवणे, विजयकुमार माळी, अमोल शिंदे, मयूर पवार, प्रकाश बच्छाव, देवेंद्र बोरसे, दीपक निकम, आनंदराव करनकाळ, वैभव सोनवणे, संदीप येळवंडे, लक्ष्मण देसले, शंकर वसावे, कविता मोरे व योगेश धात्रक उपस्थित होते.