धुळे ः टुडे १ साठी
--
गरजेनुसार मॅरेथॉनचा फोटो क्लिपार्ट घ्यावा.
शिरपूरमध्ये आज
खुली मॅरेथॉन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ११ ः श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ संचालित आमदार अमरिश आर. पटेल पोलिस ॲकॅडमी आणि अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी (ता. १२) सकाळी सहाला करवंद नाक्यावरील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज येथून सुरू होईल.
एसव्हीकेएम संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल व उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम होत आहे. परिसरातील युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महिला व पुरुष अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा होणार असून, प्रत्येकी प्रथम तीन विजेत्यांत प्रथम ३१ हजार, द्वितीय २१ हजार, तृतीय ११ हजाराचे रोख बक्षीस, करंडक व मेडल दिले जाईल. पंधराशे सहभागींना टी-शर्ट व मेडल देऊन सन्मानित केले जाणार आहे. पोलिस ॲकॅडमीच्या माध्यमातून शिस्त व शारीरिक क्षमतेला प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर, तरुणांना निरोगी जीवनशैलीकडे वळवण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरेल. शिरपूर शहर व परिसरातील धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲकॅडमीचे प्रमुख निवृत्त पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर व आयोजकांनी केले.