शहर टुडे पान चारसाठी
NSK26H29412
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित सावखेडे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शैक्षणिक नृत्याविष्काराचा आनंद घेताना शिक्षक व विद्यार्थी.
------
विवेकानंद प्रतिष्ठान सावखेडे
शाळेत हिंदी दिवस उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१२ : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित सावखेडे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी (ता.११) हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांत हिंदी भाषेबद्दल आवड, अभिरुची व आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रभावी सूत्रसंचालन, हिंदी भाषेचे सांस्कृतिक व राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे सादर केली. विशेष शैक्षणिक नृत्याविष्कार हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या नृत्याविष्कारातून हिंदी व्याकरणातील क्लिष्ट नियम मनोरंजक व नावीन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.
हिंदी विषय प्रमुख दिपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवन, शिक्षण क्षेत्रातील हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्याध्यापक हेमराज पाटील व समन्वयक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.