कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील ७,३१६ शेतकरी

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील ७,३१६ शेतकरी
Published on
टुडे पान एकसाठी --------- जिल्ह्यातील ७,३१६ शेतकरी कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ची दुसरी यादी गुरुवारी (ता.११) जाहीर करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील तब्बल सात हजार ३१६ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २ जून २०२६ला शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर केली होती. यापूर्वी योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील सात हजार ३१६ पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच हजार ३९९ शेतकऱ्यांचा व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील एक हजार ९१७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या यापुढेही टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहेत. संबंधित याद्या विविध कार्यकारी सहकारी संस्था व बँकांच्या सर्व शाखांच्या सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ....... आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन दुसऱ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com