शानभाग विद्यालयातील १,४३३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

शानभाग विद्यालयातील १,४३३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
Published on
NSK26H29413 जळगाव : ब. गो. शानभाग विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना डॉक्टर. ----------------------------------------------- ब. गो. शानभाग विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या एकूण १,४३३ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता.११) करण्यात आली. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून आरोग्यविषयक समस्या वेळेत ओळखणे, आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे व विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करणे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या आरोग्य तपासणी शिबिरात विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी, किरकोळ आजार व आवश्यक बाबींची तपासणी करून त्यानुसार मार्गदर्शन करण्यात आले. किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक औषधोपचार देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना पुढील तपासणी किंवा उपचारांची गरज असल्याचे निदर्शनास आले, अशा संदर्भित विद्यार्थ्यांना जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र येथे आवश्यक आरोग्यसेवा घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ......... आरोग्यविषयक मार्गदर्शन या उपक्रमात सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी, योग्य व सकस आहार, आरोग्याची काळजी व या काळात घ्यावयाच्या आवश्यक खबरदारीबाबत विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. किशोरवयात शरीरात होणारे विविध बदल हे नैसर्गिक आहेत. त्याबाबत विद्यार्थिनींनी कोणताही संकोच बाळगू नये, असेही मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास ती मनात न ठेवता पालक, शिक्षक किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असा सल्ला विद्यार्थिनींना देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com