टुडे पान एकसाठी
सेकंडमेन
----------------
ऑनलाईन टीव्ही रिचार्ज
करणे पडले दहा लाखांत
-----------
सायबर ठगबाजांचा फक्ड डिपॉझीटवरच डल्ला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : ऑनलाईन फिक्स डिपॉझीट प्री-मॅच्युअर करून सायबर ठगबाजांनी एका ज्येष्ठ नागरिकास दहा लाखांत फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिश कनेक्शनचे रिचार्ज केल्यानंतरही ते सुरू न झाल्याने ऑनलाईन माहिती घेत ‘रिचार्ज अपडेट’ असे टाईप करून डेबीट कार्डचा महिना व वर्ष टाकताच रमेश नारायण पाटील (वय ७४, रा. रवींद्रनगर, जळगाव) यांच्या खात्यातून दहा लाख वळते झाले आहेत. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रवींद्रनगरात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक रमेश पाटील कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी सोमवारी(ता.७) टीव्हीच्या डिशचे रिचार्ज केल्यानंतर कनेक्शन सुरू झाले नाही. परिणामी त्यांनी ऑनलाइन कस्टमर केअरचा नंबर घेऊन त्यावर संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी(ता.८) त्यांना कॉल आला व कनेक्शन सुरू झाले की नाही, अशी विचारणा केली. नंतर त्यांना गुगलमध्ये जाऊन रिचार्ज अपडेट असे टाईप करून डेबीट कार्डचा महिना व वर्ष टाकण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी सर्व प्रक्रिया केली. मात्र, डिश कनेक्शन तरीही सुरूच झाले नाही.
डेबीट कार्डची माहिती भरताच
रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधणाऱ्याने (सायबर ठगबाजाने) डेबीट कार्डची माहिती भरा व तरीही कनेक्शन सुरू झाले नाही, तर मेकॅनिक येईल, असेही सांगितले होते. कनेक्शन सुरू न झाल्याने समोरील व्यक्तीने दिलेल्या मेकॅनिकलच्या नंबरवर संपर्क साधला असता, तो नंबर लागलाच नाही. त्यामुळे त्यांना शंका आली व त्यांनी बँक खाते तपासले. त्यावेळी त्यांची फिक्स डिपॉझिट (एफडी) प्री मॅच्युअर करून त्यातून पाच वेळा प्रत्येकी दोन लाख असे एकूण १० लाख रुपये काढल्याचे लक्षात आले. याप्रकरणी रमेश पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.