धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 29420
धुळे : गरुड मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत विजयी सैनिकी विद्यालयाचे संघ.
--
सैनिकी विद्यालयाचा
खो-खो स्पर्धेत डंका
--
तालुकास्तरावर विजय मिळवत संघांची जिल्हास्तरावर झेप
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : येथील गरुड मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत मोराणे (ता. धुळे) येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयाच्या १७ व १९ वर्षाखालील दोन्ही खो-खो संघांनी यश संपादन केले. अनेक दिग्गज संघांवर मात करत या दोन्ही संघाने आता जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विद्यालयाच्या खेळाडूंनी चपळता, उत्कृष्ट समन्वय आणि बचावात्मक तंत्राचे उत्तम प्रदर्शन घडवले. अंतिम सामन्यांपर्यंतच्या प्रत्येक फेरीत खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी वर्चस्व गाजवत विजयश्री खेचून आणली. १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील या दोन्ही गटांच्या संघाने मिळवलेल्या या डबल विजयामुळे शाळेचे नाव उंचावले आहे. आता हे दोन्ही संघ लवकरच होणाऱ्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव शालिनी भदाणे, प्राचार्य एस. बी. गरुड, उपप्राचार्य एन. जे. देवरे आणि पर्यवेक्षक बी. एच. मगर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रीडा प्रमुख एस. एस. देवरे, क्रीडाशिक्षक बी. एम. बाविस्कर, प्रशिक्षक प्रशांत वाडीले आदींनी मार्गर्शन खेळाडू विद्यार्थ्यांना झाले.