फोटो -NSK26H29425
नाशिक : साई केअर कॉलेजच्या वतीने फिजिओथेरपी दिनानिमित्त म्हसरूळ गावात काढण्यात आलेली जनजागृती रॅली.
साई केअर कॉलेजमध्ये
फिजिओथेरपी दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१२ : शिवांजली शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित साई केअर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नाशिक येथे ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान ''जागतिक फिजिओथेरपी दिन'' साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डॉ. शुभम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी ''बेसिक लाइफ सपोर्ट'' चे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. ८ सप्टेंबर रोजी फिजिओथेरपी दिनानिमित्त मुख्य सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हिमानी दालमिया, डॉ. ज्ञानेश्वर गुंजाळ आणि डॉ. अनाथ उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग, ट्रेझर हंट, वादविवाद स्पर्धा आणि ''गेट्स डेव्हिएशन'' रॅम्प वॉक यांसारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ९ सप्टेंबर रोजी म्हसरूळ परिसरात ''फिजिओथेरपी जनजागृती रॅली'' काढण्यात आली. तसेच कॉलेजच्या ओ.पी.डी.मध्ये स्थानिक नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी तपासणी व आरोग्य शिबिर घेण्यात आले. सदर उपक्रम चेअरमन डॉ. भगीरथ जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानेश कुमार बी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.