माझ्या जीवनातील दीपस्तंभ

माझ्या जीवनातील दीपस्तंभ
Published on
(१५ सप्टेंबर रोजी टुडेमध्ये प्रसिद्धीसाठी...) फोटो - NSK26H29462 माझ्या जीवनातील दीपस्तंभ : डॉ. मो. स. गोसावी ----------------------------------------- नाशिकमध्ये आपल्या शैक्षणिक कार्याने गोखले एज्युकेशन सोसायटीला नवी उंची देणारे डॉ. मो. स. गोसावी सर आणि सर्व सहकाऱ्यांना मायेच्या धाग्यात बांधून ठेवणाऱ्या डॉ. सौ. सुनंदाताई गोसावी, हे माझ्या जीवनातील खरे दीपस्तंभ आहेत. मंगळवारी (ता.१५) डॉ. गोसावी यांची जयंती, त्यानिमित्त... - प्रा. वैशाली चौधरी, नाशिक सन १९८५ साली मुली आणि महिलांसाठी स्वतंत्र महिला महाविद्यालय सुरू करण्याचा डॉ. मो. स. गोसावी यांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय काळाच्या कितीतरी पुढचा होता. पूर्वीचे जिज्ञासा आणि आजचे एस.एम.आर.के.-बी.के.-ए.के. महिला महाविद्यालय माझ्यासाठी केवळ शिक्षणसंस्था नाहीत; ते माझे जीवन घडविणारे विश्वविद्यालय आहे. मी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि पुढे याच संस्थेतील सहकारी झाले. माईंच्या व्यक्तिमत्त्वातून मला शिस्त, नीटनेटकेपणा, साधेपणा आणि माणसांशी प्रेमाने वागण्याची शिकवण मिळाली. चांगल्या कामाचे मनापासून कौतुक करणे, चूक झाली तर रागावण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगणे आणि प्रत्येकाला आपुलकीने जोडून ठेवणे, हे त्यांचे नेतृत्व मला सदैव प्रेरणा देत राहील. गोसावी सरांनी कौशल्याधारित व व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून मुलींसाठी स्वावलंबनाची नवी दालने खुली केली. विविध उपक्रम, स्पर्धा आणि व्याख्यानांमुळे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास झाला. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीनेही मला नेहमीच प्रभावित केले. एक प्रसंग माझ्या मनात कायमचा कोरला आहे. एका कार्यक्रमानंतर अप्पांना थोडे अस्वस्थ वाटत असताना मी त्यांना आधार देऊन गाडीपर्यंत पोहोचवले. तेव्हा त्यांनी म्हटलेले ‘थँक यू’ आणि दिलेला ‘सुखी रहा’ हा आशीर्वाद माझ्यासाठी आयुष्यभराचा प्रसाद आहे. त्या दोन शब्दांत त्यांची नम्रता, माणुसकी आणि प्रत्येक व्यक्तीप्रति असलेला आदर जाणवला. माईंच्या घरातील स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा आणि त्यांच्या साध्या राहणीमानातूनही खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या केसांतील सुंदर फूल आजही त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देते. आप्पा आणि माई, आपण मला केवळ शिकवले नाही, तर मला घडवले. आपण मला केवळ ज्ञान दिले नाही, तर आयुष्य जगण्याची दृष्टी दिली. या दोघांप्रति मनःपूर्वक कृतज्ञता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com