ॲंकर
बातमी आजच घ्यावी
------------------
‘ग. स.’च्या कर्जमर्यादत पाच लाखांची वाढ
---------
अध्यक्षा रागिणी चव्हाण : सोसायटीची आज वार्षिक सर्वसाधारण सभा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१२ : येथील ग. स. सोसायटी अर्थात सरकारी नोकरांची सहकारी संस्थेने यंदा सभासद कर्जमर्यादा पाच लाखांनी वाढवली आहे. सभासदांना आता १५ऐवजी २० लाख, तर वर्ग चार कर्मचाऱ्यांना साडेसात लाखांऐवजी १२ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. सभासदांना बैठकभत्ता एक हजार रुपये दिला जाणार आहे. ग. स. सोसायटीने यंदा सभासदांसाठी लाभांश दहा टक्के जाहीर केला आहे. नवीन सभासदांचे शुल्कदेखील आठ हजारांवरून चार हजारांपर्यंत कमी केली आहे, अशी माहिती ग. स. सोसायटीच्या अध्यक्षा रागिणी चव्हाण यांनी शनिवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली. पंचवार्षिक काळातील ही शेवटची सभा आहे. यासभेकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी(ता.१३) दुपारी एकला नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. सभेच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी संचालकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी अध्यक्षा चव्हाण माहिती देत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, ग. स. सोसायटीने मयत सभासदांचे विविध कर्ज माफ केले आहे. त्यात जामिनकीचे कर्ज २ कोटी ३९ लाख, तर अन्य ३ कोटी ७४ लाख रुपये मयत सभासदांना माफ झाले आहे. ज्या सभासदांनी कर्ज घेतले नाही, पण मयत झाले आहेत, अशा सभासदांना १ कोटी १० लाख रुपये अर्थसहाय्य केले आहे.
विरोधकांकडून सोसायटीच्या भरतीप्रकीयेवर आक्षेप घेण्यात आला असला तरी यंदा ग. स.चा आकृतीबंध कपात करण्यात आला आहे. ३४५ कर्मचाऱ्यांवरून तो ३१०वर आणण्यात आला असल्याचे संचालक उदय पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ सभासद योजनेअंतर्गत सभासद होऊन २५ वर्षे झालेल्या सभासदांना प्रत्येकी ५००१, तर ३० वर्षे पूर्ण केलेल्यांना प्रत्येकी सात हजार एक रुपये भेट देण्यात येणार आहे. वय ८० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा पाच लाखांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. आगामी काळात सभासद वाढविण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे
-----
....
विरोधकांना आता साक्षात्कार झाला : चव्हाण
ग. स. सोसायटीमध्ये गेले ४ वर्षे सर्व संचालक एकाच मंचावर होते. पण आजच्या सभेला रावसाहेब पाटील, अमरसिंग पवार, रवींद सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रतिभा सुर्वे हे उपस्थित नसल्याचे विचारले असता, चार वर्षे हे संचालक आमच्या सोबत होते. सोबतच निर्णय घेतले, पण आता महिला अध्यक्षा झाल्यावर त्यांना विरोधक होण्याचा साक्षात्कार झाला, असा टोला अध्यक्षा चव्हाण यांनी लगावला.
-------------