पोलिस आयुक्तांचा टवाळखोरांना ‘दणका’

पोलिस आयुक्तांचा टवाळखोरांना ‘दणका’
Published on
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४०२ टवाळखोर तडीपार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्न वातावरणात पार पडावा, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. शहरातील ४०२ सराईत व टवाळखोर संशयितांना २७ सप्टेंबरपर्यंत तडीपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी टवाळखोरांविरोधात तडीपारीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. ऐन सणासुदीच्या काळात सार्वजनिक शांतता भंग करणे, उपद्रव माजविणे अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या समाजकंटकांना यामुळे चाप बसणार आहे. परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी १२७ व परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांनी २७५ टवाळखोरांविरोधात तडीपारीची कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनांद्वारे व पायदळ गस्त वाढवली असून, संवेदनशील भागात विशेष निगराणी ठेवली जात आहे. तसेच मुख्य मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास देखरेख ठेवली जाणार आहे. -- कोट (फोटो वापरावा) नाशिककरांनी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरा करावा. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या किंवा शांतता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक -- ​परिमंडळनिहाय कारवाई ​परिमंडळ एक (एकूण १२७): मुंबई नाका: ३१ भद्रकाली २४ पंचवटी २२ गंगापूर २२ सरकारवाडा ११ ​म्हसरूळ: १० आडगाव ०७ .... ​परिमंडळ दोन (एकूण २७५): सातपूर ५३ उपनगर ४६ ​नाशिक रोड: ४२ अंबड ४० इंदिरानगर ३६ देवळाली कॅम्प: ३३ एमआयडीसी २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com