विद्यार्थिनींनी मेहंदीतून दिला आरोग्यदायी जीवनाचा संदेश

विद्यार्थिनींनी मेहंदीतून दिला आरोग्यदायी जीवनाचा संदेश
Published on
फोटो : NSK26H29470 नंदुरबार : मेहंदी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींसमवेत प्रशांत बागूल, भिकू त्रिवेदी, सीमा पाटील, सुनील शाह, अनघा जोशी, पल्लवी चव्हाण आदी. ---------------------- विद्यार्थिनींनी मेहंदीतून दिला आरोग्यदायी जीवनाचा संदेश श्राॅफ हायस्कूलमध्ये मेहंदी स्पर्धा उत्साहात नंदुरबार, ता. १२ : येथील श्रीमती हि. गो. श्राॅफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमानिमित्त विद्यार्थिनींसाठी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. ‘मेहंदीचा रंग, प्रबोधनाचा संग’ या विषयांतर्गत आयोजित या स्पर्धेत विद्यार्थिनींनी ‘जंक फूडला नकार, आरोग्यदायी जीवनाचा स्वीकार’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आकर्षक आणि प्रबोधनात्मक मेहंदीचे रेखाटन केले. स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रशांत बागूल यांनी विद्यार्थिनींना जंक फूड सेवनाचे दुष्परिणाम सांगून संतुलित व सकस आहाराबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेचे संयोजन अनघा जोशी व पल्लवी चव्हाण यांनी केले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षक सीमा पाटील आणि सुनील शाह उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण अनघा जोशी व पल्लवी चव्हाण यांनी केले. विजेत्यांमध्ये इयत्ता आठवी- प्रथम क्रमांक अक्षरा संतोष गवळी, द्वितीय अक्षरा जितेंद्र मोरे, तृतीय कावेरी श्रीराम कुंभार, उत्तेजनार्थ सृष्टी वाल्मिक गांगुर्डे इयत्ता नववी- प्रथम क्रमांक किंजल राहुल बडगुजर, द्वितीय नेहा ज्ञानेश्वर सावंत, तृतीय प्रांजल रोहिदास माळी, उत्तेजनार्थ वैष्णवी अतुल पतंगपुरे. इयत्ता अकरावी प्रथम क्रमांक रोशनी सुनील मराठे. स्पर्धेतील विजेत्यांचे आणि सहभागी विद्यार्थिनींचे संस्थेच्या समन्वयक सुषमा शाह यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com