टुडे पान २ साठी... अवतीभवती

टुडे पान २ साठी... अवतीभवती
Published on
धुळे : टुडे पान २ साठी... अवतीभवती -- फोटो : 29469 महानगर मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी लाडे धुळे : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रविणकुमार लाडे यांची महानगर मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. लाडे हे अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. विद्यादानाबरोबरच शिक्षकांच्या समस्या, तसेच विद्यार्थी व पालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, माजी आमदार सुधिर तांबे यांनी कौतुक केले. -- दुधेडिया हायस्कूलमध्ये शिक्षक- पालक मेळावा धुळे : हिंदी एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एस.पी. दुधेडिया हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला. या वेळी २०२६- २७ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. बैठकीत पालक-शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी जे. डी. कागणे, उपाध्यक्षपदी पियरसिंग सेनानी आणि सचिवपदी सी.जे. यांची शंखपाळ निवड झाली. तसेच हिरा सोनवणे आणि लक्ष्मी धोत्रे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. व्यासपीठावर मुख्याध्यापक कागणे, शिक्षक व्ही. डी. जैन, एम. आर. अमृतकर, आर. सी. जैन, एच. एम. देवळे, ए. बी. राठोड आणि एस. एस. अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमात पालकांनी शाळेकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या, तर शिक्षकांनीही पालकांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. आर.सी. जैन यांनी सूत्रसंचालन केले. ए. बी. राठोड यांनी आभार मानले. -- स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा धुळे : येथील स्त्री शिक्षण संस्थेच्या कमलाबाई शं. कन्या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी शाळेचे कामकाज पाहिले. मुख्याध्यापिका रचना मोरे यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापिका पूर्वा चौधरी यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यादी वाचन दामिनी माळी यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी नीता सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष सीए के. यु. नाबरिया, सचिव शिल्पा म्हस्कर, सहसचिव साधना मानेकर, खजिनदार अरुणा नाईक, सदस्या जयश्री शहा, मुख्याध्यापिका छाया नाईक, पर्यवेक्षिका अरुणा सोनवणे, मनीषा पवार, अरुंधती ब्रम्हे, दत्तराज थोरे, प्राथमिक मुख्याध्यापिका अरुणा पानपाटील, बालमंदिर मुख्याध्यापिका सोनाली जोशी उपस्थित होत्या. दक्षता निकम व प्रगती वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. कनिष्का पाटील व प्रीती मुलमुले यांनी सूत्रसंचालन केले. हेमलता बागुल व अध्यक्षा जयश्री शिरोळे यांनी मार्गदर्शन केले. रवींद्र टाकणे, सुज्ञातमती साळी, नीता बागुल, वैशाली सोंजे, धनश्री मुधोळकर, वर्षा जोशी, रंजीता गवते यांनी संयोजन केले. मधुरा पुराणिक यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com